डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील त्या कट्ट्यावर लागली झाडे

 



पालिका प्रशासनाने घेतला निर्णय 

   डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील दोन व्हाईन शॉपमधून दारूच्या बाटल्या घेऊन समोरील कट्ट्यावर बसून दारू पीत बसलेले दिसतात. १ पालिका प्रशासन आणि डोंबिवली रामनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कट्ट्यावरील दारुड्यांना चोप देत हाकलून दिले. आता त्या कट्ट्यावर पालिका प्रशासनाने झाडे लावली आहे. शुक्रवारी १९ तारखेला पालिकेच्या या पर्यावरण निर्णयावर डोंबिवलीकरांनी कौतुक केले आहे.



 डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील दोन कट्ट्यावर दारुडे दररोज सायंकाळी सात नंतर दारू पीत बसलेले दिसतात. समोरील व्हाईन शॉपमधून दारू घेऊन दारुडे कट्ट्यावर बसलेले असल्याने त्या रस्त्यावरून सायंकाळी सात नंतर नागरिक जात नाही. डोंबिवली रामनगर पोलीस आणि पालिका प्रशासनाने कारवाई करत येथील कट्ट्यावरील दारुड्यांना हाकलावून लावले. दारुडे या कट्ट्यावर बसणार नाही अशी व्यवस्था करत शुक्रवारी १९ तारखेला पालिकेच्या 'फ' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त भरत पवार, फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख, कर्मचारी यांनी जेसीबीच्या सहाय्याने कट्ट्यावरील पेव्हरब्लॉक काढले. या कट्ट्यावर पालिका प्रशासनाने झाडे लावली. पालिकेच्या या कामावर डोंबिवलीकर खुश झाले असून त्याच्या या कामाचे कौतुक होत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post