मुंबई, ( श्रावणी कामत ) : शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिर शिशुविहार गिल्ड एक अनोखा प्रकल्प शैक्षणिक वर्ष २०२४/२५ मधे शिशुविहार माध्यमिक शाळेत एक अनोखा प्रकल्प राबविण्यात आला.
गिनीज वर्ल्ड बुकमध्ये शाळेचे स्काऊट गाईडचे १५ विद्यार्थी व शिशुविहार गिल्डचे अध्यक्ष व सभासद सहभागी झाले. त्यांनी ११५ क्रोशा स्कार्फ बनवून एम.आय. सी. क्यू. या संस्थेने बनवलेल्या ४५०० स्कार्फ मधे भागीदारी करून गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड सर्टिफिकेटचे मानकरी ठरले. ५ वेळा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करणार्यां
सुबश्री नटराजन यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट देण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनवलेले हे स्कार्फ लोक.टिळक रुग्णालयातील कॅन्सर पेशंटना वाटण्यात आले.
या वेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिशुविहार गिल्डच्या सभासद व शिशुविहार माध्यमिकच्या शिक्षिका वैशाली यांनी केले तर आभार प्रदर्शन शिंदे यांनी केले. या पूर्ण उपक्रमास शिशुविहार माध्यमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका व शिशुविहार गिल्डच्या माजी अध्यक्षा दक्षा चित्रोडा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच शिशुविहार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमास पाठिंबा दिला.

