अलिबाग सिशोर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दिलीपकुमार भड

 



अलिबाग (धनंजय कवठेकर) :  रोटरी क्लब अलिबाग सिशोरचे अध्यक्ष आणि सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांचा पदग्रहण सोहळा समारंभाचे प्रमुख पाहुणे रायगड डिस्ट्रिक्ट रोटरी क्लबचे कार्यकारी सचिव विवेक दीक्षित, असिस्टंट गव्हरनर डॉ. दीपक खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार (ता.३) रोजी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात पार पडला.


रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोरच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे माजी प्रथमवर्ग अधिकारी दिलीपकुमार भड यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिवपदी आरसीएफचे अधिकारी अंकुश पाटील, खजिनदारपदी जिल्हा परिषदेचे माजी अभियंता जनार्दन चापडे या दोघांची पुन्हा निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीपकुमार भड यांना मानाची कॉलर मावळते अध्यक्ष डॉ. निलेश म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करून त्यांना अध्यक्षपदाची, तर अंकुश पाटील यांना सेक्रेटरी आणि जनार्दन चापडे यांना खजिनदारपदाची सन्मानाची पिन देण्यात आली. 


८ व्या पदग्रहण सोहळ्याला रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉ. निलेश म्हात्रे यांनी नवीन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मागील वर्षातील त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. मागील वर्षी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल डॉ. निलेश म्हात्रे यांचे डिस्ट्रिक्ट रोटरीचे कार्यकारी सचिव विवेक दीक्षित, असिस्टंट गव्हरनर डॉ. दिपक खोत यांनी कौतुक केले. त्याचबरोबर नवनिर्वाचीत अध्यक्ष दिलीपकुमार भड यांनी आगामी वर्षात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती पीपीटीच्या माध्यमातून दिली. यावेळी लक्ष्मण पाटील, डॉ राजाराम हुलावाण, सुधीर काटले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी तन्वी शेट्ये, माधुरी म्हात्रे यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post