महापालिका शिक्षण विभाग व संपर्क फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
कल्याण, ( शंकर जाधव) : संपर्क फाऊंडेशन एससीईआरटी, पुणे आणि समग्र शिक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क फाऊंडेशन, निपुण या शैक्षणिक कार्यक्रमाबाबत, महापालिका शिक्षण विभागातील निवडक १५ महापालिकेच्या शाळांमध्ये संपर्क फाऊंडेशनमार्फत अध्ययन अध्यापन हे तंत्रशुद्ध, क्रमबद्ध, डिजिटल, मनोरंजक पद्धतीने व्हावे, यासाठी डिजिटल डिव्हाइस देण्यात आले.
त्यांचा योग्य वापर तसेच डिव्हाइसेस बाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आचार्य अत्रे रंग मंदिर, कल्याण (पश्चिम) येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये महापालिकेच्या १५ शाळांचे मुख्याध्यापक तसेच संपर्क फाऊंडेशनचे प्रदीप राणा, उल्हास शहा, कांबळे, मयुरी कुलकर्णी, मेटकर यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेत शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी डिजिटल अध्यापनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले आणि डिजिटल डिव्हाइसेस जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपर्क संस्थेस आवाहन केले.
या कार्यशाळेस APO अर्चना जाधव, विषयतज्ञ डिजिटल क्लासरूम कार्यशाळा संपन्न, भोईर, सरदार, DO चंदन माने यांनी तांत्रिक कामकाज पाहिले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन विषयतज्ज्ञ राजाभाऊ शेप यांनी केले. कार्यशाळेतील संपर्क संस्थेच्या टीमचे आणि सर्व उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी मानले.


