दिव्यात भगवा सप्ताहनिमित्त सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra WebNews
0

 



दिवा, (आरती मुळीक परब) :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात भगवा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचेच अवचित्त साधून दिवा विभागात दिवा स्टेशन परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने स्टेशन परिसरात सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.




 यात लोकांनी भरपूर प्रमाणात गर्दी करून आपले सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेतले. सदर कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, शहर संघटिका ज्योती पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक, युवा शहराधिकारी अभिषेक ठाकूर, शहर समन्विका प्रियंका सावंत, स्मिता जाधव, विभाग प्रमुख हेमंत नाईक, शनिदास पाटील, नागेश पवार, मच्छिंद्र लाड, चेतन पाटील, रवी रसाल, उपविभाग प्रमुख अजित माने, संदीप राऊत, योगेश निकम शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)