विकलांग डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांवर कारवाई

 



डोंबिवली, (शंकर जाधव) :  विकलांग डब्यातून विनाविकलांग प्रवाशांवर डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक गजेंद्र राऊत आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोनार आणि डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक मनोहर त्यांच्यासोबत ठाण्यातील अंमलदारांनी मंगळवारी कारवाई केली.


या कारवाईत ७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू राहणार असल्याचे डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले. तरी विनाविकलांग प्रवाशांनी  विकलांग डब्बातून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post