अंबरनाथ एमआयडीसीमध्ये श्री गणेश केमिकल्स येथे भीषण आग

 


 मंत्री उदय सामंत आणि नगराध्यक्ष तेजश्री करंजुले- पाटील यांनी घटनास्थळी पाहणी

अंबरनाथ : अंबरनाथ MIDC परिसरातील श्री गणेश केमिकल्स येथे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष CA तेजश्री विश्वजीत करंजुले- पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.


या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. आग लागण्यामागील कारणे, झालेल्या नुकसानीचा आढावा तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. औद्योगिक परिसरात अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मंत्री सामंत आणि नगराध्यक्ष करंजुले यांनी औद्योगिक आस्थापनांनी सुरक्षा नियमांचे पालन करणे, नियमित फायर ऑडिट करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा सक्षम ठेवणे आवश्यक असल्याचेही सांगितले, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.


या पाहणीदरम्यान आमदार डॉ. श्री. बालाजी किणीकर, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, नगरसेवक विश्वजीत करंजुले- पाटील, अभिजीत करंजुले- पाटील तसेच शिवसेना व भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post