सोगाव विभागात आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम



 मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांचा पुढाकार 


सोगाव, (अब्दुल सोगावकर)  : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांच्यातर्फे सोगाव विभागात आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


        यावेळी वसीम कुर यांनी गावांतील अंतर्गत रस्त्यावर, विहीर, शाळा, मशीद, मंदिर आदी ठिकाणी पावसामुळे वाढलेली चिकट प्रकारची शेवाळ ब्लिचिंग पावडरने काढली, तसेच अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गवताची यंत्राच्या साहाय्याने साफसफाई केली. याकामी वसीम कुर यांना सलमान कुर, रिजवान वाकनिस, बाबू कुर, कैलास भगत, जयेंद्र राऊत, माहिद कुर, साहिल शिरगावकर, प्रदीप उर्फ काशा भगत, अधू भगत, लालू राऊत यांनी सहकार्य करत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. याबद्दल ग्रामस्थांनी वसीम कुर व त्यांच्या मित्रपरिवाराचे आभार मानले.





Post a Comment

Previous Post Next Post