Ramse horror movie is back : रामसे ब्रदर्सची ओटीटीवर एन्ट्री

 



रामसे ब्रदर्स हे ९० च्या दशकात 'वीराना', 'पुरानी हवेली', 'तहखाना' आणि 'हॉटेल' सारख्या हॉरर चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले होते. काही काळानंतर रामसे ब्रदर्सने चित्रपट निर्मितीकडे पाठ फिरवली होती. मात्र तेच रामन ब्रदर्स पुन्हा आपल्या हॉरर चित्रपटांतून ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज झाले आहेत.  


चित्रपट निर्माते आणि 'रामसे ब्रदर्स'चे सागर रामसे आता 'बंद दरवाजा के पीछे' ही नवीन हॉरर मालिका बनवत आहेत.  ही मालिका सायकॉलॉजिकल हॉररचा एक नवा आणि अनोखा पैलू  सादर करणार आहेत. या सिरीजच्या माध्यमातून पुन्हा आपल्या शैलीत पुनरागमन करणाऱ्या रामसे ब्रदर्सची बंद दरवाजा के पीछे ही हॉरर सिरीज प्रेक्षकांना घाबरण्यासोबतच विचार करायला भाग पाडेल, असे सागर रामसे सांगतात.


या मालिकेबद्दल बोलताना सागर म्हणाले, “आमची मालिका ही एक नवीन स्क्रिप्ट आहे जी मनोवैज्ञानिक भयपटाच्या शोधात खोलवर जाते. ही मालिका एका धाडसी नवीन दिशेचा प्रवास आहे, ज्यामध्ये आधुनिक कथानकासह साहसी प्रवासाचा समावेश आहे, जी प्रेक्षकांना रोलर कोस्टर राईडवर घेऊन जाण्याचे वचन देते.”

 तो म्हणाला, “आजच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ही स्क्रिप्ट काळजीपूर्वक तयार केली गेली आहे, ज्यामध्ये भीती, थरार, रहस्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भयपट यांचे अनोखे मिश्रण आहे, ज्यामुळे ते वेगळे आहे. ही मालिका गडद, ​​रहस्य आणि अलौकिक घटनांवर आधारित असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 


 हा शो Alt वर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर काम करताना मला आनंद होत असल्याचे सागर रामसे यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post