कल्याण / शंकर जाधव : कपडे धुण्यासाठी नदीत गेलेल्या दोन बहिणी नदीच्या प्रवाहाने बुडाल्या असून यातील एकीचा मृत्यू झाला असून दुसरिचा शोध सुरु आहे. ही घटना कल्याण जवळील टिटवाळा वासुन्द्री परिसरातील घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आलिया अन्सारी (१८) असे नदीत बुडालेल्या तरुणीचे नाव आहे.तर सना अन्सारी (८) हिचा अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहे. नदी काठावर असलेल्या नागरिकांनी या दोघीना वाहून जाताना पाहताच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाकडून तातडीने शोध सुरु करण्यात आला मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत असून प्रवाहात शोध पथकाची बोट देखील वाहून जात असल्याचे अधिकार्याचे म्हणणे आहे.