Sbi bank : स्टेट बॅंकेच्या कर्जावरील व्याजदरात वाढ





नवी दिल्ली :   देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या सर्व मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे.  SBIने सलग तिसऱ्यांदा MCLR मध्ये वाढ केली आहे.  सरकारी बँकेने जून २०२४ पासून आतापर्यंत कर्जाच्या दरात ०.३० टक्के वाढ केली आहे.  यामुळे लोकांना २० वर्षांसाठी घेतलेल्या ५० लाख रुपयांच्या गृहकर्जावर व्याज म्हणून २.३२ लाख रुपये अधिक द्यावे लागतील.  यासह, कर्जाचा मासिक ईएमआय ९६३ रुपयांनी वाढून ४४,३४५ रुपयांवरून ४५,३०८ रुपये होईल.  दुसरीकडे, ३० लाखांच्या गृहकर्जावर एकूण १.४० लाख रुपये अधिक व्याज भरावे लागणार आहे.


SBI ने १५ ऑगस्ट रोजी आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) १० बेसिस पॉईंटने वाढवला. RBI ने सलग ९ व्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही MCLR मध्ये नवीनतम वाढ झाली आहे. MCLR हा कर्जाचा किमान व्याजदर आहे. आरबीआयच्या निर्देशांनुसार, बँकांना एमसीएलआरपेक्षा कमी दराने कर्ज देण्याची परवानगी नाही. SBI ने तीन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR ९ टक्क्यांवरून ९.१ टक्के केला आहे. ओव्हरनाइट MCLR ८.१ टक्क्यांवरून ८.२ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच एसबीआयकडून कर्ज घेण्यासाठी आता किमान ८.२ टक्के व्याज द्यावे लागणार आहे.


तपशील (कर्जाची रक्कम) ३० लाख ५० लाख

 कर्जाचा कालावधी २० वर्षे २० वर्षे

 मासिक EMI (८.८ टक्के व्याज) रु २६,६०७ रु. ४४,३४५

 एकूण व्याज ३३.८६ लाख ५६.४२ लाख

 EMI (९.१ टक्के व्याज) रु. २७,१८५ रु. ४५,३०८

 एकूण व्याज ३५.२४ लाख ५८.७४ लाख


Post a Comment

Previous Post Next Post