रोहा (धनंजय कवठेकर): रोहा तालुक्यांतर्गत असलेल्या शेडसई ग्रामपंचायतीमधील भागीरथीखार गावातील श्री.हनुमान मंदिराचे बांधकाम निधीअभावी प्रलंबित असल्याचे गावातील काही ग्रामस्थांनी दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष दिलीप (छोटमशेठ) भोईर ह्यांच्यापर्यंत पोहोचविले होते. या मंदिराचे रंगकाम आणि निवारा शेड बांधून देण्याचे त्यांनी वचन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वनिधी देऊन रंगकाम आणि निवाराशेडीचे बांधकाम पूर्ण करून दिले.
"भागीरथीखार ग्रामस्थांच्या उपयोगी पडण्याचे माझ्या नशिबात होते. त्यांना दिलेलं वचन पूर्णत्वाला गेल्याचे आणि ग्रामस्थांना सहकार्य करू शकल्याचे सात्विक समाधान मला खूप बळ देऊन गेले आहे."अशा शब्दांमध्ये छोटमशेठ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भागीरथीखार येथील कार्यक्रमावेळी गावातील मंडळाचे सेक्रेटरी देवीचंद्र म्हात्रे,भाजप रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर, उपाध्यक्ष भूषण साळवी, कोकबन बूथ अध्यक्ष भारत खाडे,अलिबाग मंडल युवा मोर्चा सदस्य तुषार महाडिक, साळाव ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव कांबळी, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे सोशल मीडिया संयोजक अमित म्हात्रे, सदस्य आदिनाथ सानेकर, भाजप अलिबाग मंडल कार्यकारिणी सदस्य पंकज घरत, वरंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधीर चेरकर,चणेरा विभाग तंटामुक्ती अध्यक्ष शुभम देसाई हे उपस्थित होते.