रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वतीने डोंबिवलीत लाँग मार्च

Maharashtra WebNews
0


डोंबिवली ( शंकर जाधव ) : विविध मागण्याकरता येत्या शुक्रवारी २० तारखेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ठाणे प्रदेश व कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ यांचे विद्यमाने ठाणे प्रदेश उपाध्यक्ष व कल्याण-डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष माणिकराव उघडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य लाँग मार्च काढण्यात येणार आहे. याबाबत डोंबिवलीत माहिती देताना माणिक उघडे, कामगार नेते महादूसिंग राजपूत, रिक्षा युनियन डोंबिवली अध्यक्ष  संजय पवार, समाजसेवक शिवा पवार, जिल्हासंघटक वसंत टेकडे, डोंबिवली शहर युवक अध्यक्ष विकास खैरनार, जिल्हासंपर्क प्रमुख तुकाराम पवार,महिला आघाडी प्रमुख वैशाली सावर्डेकर आदी उपस्थित होते.



 याबाबत माहिती देताना माणिक उघडे म्हणाले, लाँग मार्च शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता पूर्वेकडील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा डोंबिवली (पूर्व) येथून निघून कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या मुख्यालयावर धडकणार आहे. कल्याण - डोंबिवली शहरातील झोपडपट्टीमध्ये शासनाची क्लस्टर  योजनेचा तात्काळ शुभारंभ करा यासह अनेक महत्वाच्या मागण्या आयुक्तांसमोर मांडण्यात येणार आहेत. आंबेडकरी जनतेच्या प्रमुख मागण्यांसाठी हजारो झोपडपट्टी धारक आंबेडकरी जनता मोर्चात सहभागी होणार असल्याचेही उघडे यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)