KDMC Corporation Sport: कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेमार्फत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात !



कल्याण (शंकर जाधव):  महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार प्रसाद बोरकर, उपआयुक्त (क्रीडा) आणि सहा. आयुक्त तथा नोडल अधिकारी स्नेहा करपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषद, ठाणे व कल्याण - डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने शासनाच्या ४९ व्या आंतर शालेय विविध क्रीडा  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दि. १० सप्टेंबरपासून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. त्यानुसार सावळाराम टर्फ, वाणी विद्यालय जवळ, कल्याण (प) येथे नेहरू हॉकी स्पर्धा आर्या गुरुकुल व डॉन बॉस्को या दोन संघात झाली. सदर स्पर्धेमध्ये १६  संघांनी सहभाग दर्शविला आहे. १५ वर्षाखालील मुलांच्या खेळात ४ शाळांनी तर १७ वर्षाखालील मुलांच्या खेळात ७ आणि १७ वर्षाखालील मुलींच्या खेळात ५ संघानी सहभाग दर्शविला आहे.




   १७ वर्षाखालील मुलींच्या संघात प्रथम क्रमांक रिटा मेमोरियल, द्वितीय क्रमांक डॉन बॉस्को, डोंबिवली आणि तृृतीय क्रमांक आर्या गुरुकुल या संघानी विजय मिळविला. तर १७ वर्षाखालील मुलांच्या संघात प्रथम क्रमांक डॉन बॉस्को, डोंबिवली, द्वितीय क्रमांक रिटा मेमोरियल आणि तृृतीय  क्रमांक आर्या गरुकुल या संघानी विजय मिळविला आहे. त्याचप्रमाणे १५ वर्षाखालील मुलांच्या संघात *प्रथम क्रमांक रिटा मेमेरियल, द्वितीय क्रमांक डॉन बॉस्को आणि तृतीय क्रमांक आर्या गुरुकुल या संघानी मिळविला आहे. या तिन्ही गटातील प्रथम क्रमांकावरील संघाना विभाग स्तरावर पाठविण्यात आले आहे.

  सदर समयी क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, तज्ञ व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर, कृष्णा माळी, महादेव क्षीरसागर , खेळप्रमुख विजय सिंग, पंच,कर्मचारी वर्ग आणि सर्व क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post