मुरूड : मुरूड तालुक्यातील भव्य समुद्रकिनारा लाभलेला व पर्यटकांचे खास आकर्षण व निसर्ग रम्य असलेल्या काशिदमध्ये ग्रामपंचायत अतंर्गत विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला.
नव्यानेच शेकापक्षातून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या ग्रा.प. सदस्या दिपा कासार यांच्या मागणीने व भाजप जिल्हा सरचिटणीस ॲड महेश मोहिते यांच्या प्रयत्नातून ३२ लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीतून काशिद बीच सुशोभीकरण ६ लाख रुपये निधी, काशिद गाव ते काशिद स्ट्रिट लाईट-२ लाख रुपये निधी, चिकणी गावात अंतर्गत रस्ता तयार करण-५ लाख रुपये निधी, काशिद सर्वे गावदेवी मंदिराजवळ साकव बांधणे-५ लाख रुपये निधी, काशिद सर्वे गावात विहीरीवर शेड बांधणे-३ लाख रुपये निधी, सर्वे गावात गणपती विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता ५ लाख रुपये निधी आदी विकासकामाचा समावेश आहे.
काशिद ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या विविध विकासकामाचे भूमिपूजन सोहळा भाजप सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजप मुरूड तालुका अध्यक्ष शैलेश काते, माजी भाजप मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, महेश मानकर, भाजप मुरूड चिटणीस संदिप चिरायू, काशिद ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या विविध विकासकामाचे भूमिपूजन सोहळा भाजप सरचिटणीस अॅड महेश मोहिते यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजप मुरूड तालुका अध्यक्ष शैलेश काते, माजी भाजप मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, महेश मानकर, भाजप मुरूड तालुका सरचिटणीस संदिप चिरायू, गणेश कट, हरेश पाटील, ॲड. रोहन खोपकर, व मुरुड तालुका महिला मोर्चा व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच काशिद ग्रामपंचायत सरपंच संतोष राणे, ग्रामसेवक म्हात्रे, ग्रा.प.सदस्या दीपा कासार आणी काशिद ग्रामस्थ आदीची उपस्थिती होती. यावेळी भाजप सरचिटणीस ऑडिओ. महेश मोहिते आणी उपस्थित भाजप पदाधिकारी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.