डोंबिवली ( शंकर जाधव ) : पाणीटंचाई आणि अनियमित पाणीपुरवठा या गंभीर समस्यावर चर्चा करण्याकरता मंगळवारी तारखेला पालिका अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत डोंबिवली पश्चिमेतील सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक पार पडली.
माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या पालिका अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त, 'ह'प्रभाग क्षेत्र कार्यकारी अभियंता ( पाणीपुरवठा ), उप अभियंता (पाणीपुरवठा ) व सर्व पक्षीय नगरसेवक उपस्थित होते.
या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती केली.पाणी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा झाल्यावर अतिरिक्त आयुक्त यांनी पाणीपुरवठा समस्या बाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
