कोल्हापूर, ( शेखर घोंगडे ) : मतदारांनी अजूनही आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही, त्यांना आज दिनांक १९ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु असून ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच आज दिनांक १९ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
मतदार यादांमध्ये आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव असल्याची खात्री करून घेता येईल व आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदान प्रक्रियेत सहभागी होता येईल. आपले नाव मतदार यादीत आहे का हे पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर किंवा Voter Helpline या ॲपवर अत्यंत सुलभतेने नाव असल्याची खात्री करता येते. तसेच मतदार यादीत आपले नाव नसल्यास नमुना क्रमांक ६ भरून मतदार यादीत नांव सामाविष्ट करावयासाठी अर्ज करता येईल.
नागरीकांनी आपले आवश्कतेप्रमाणे वरील नमुन्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) व कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये रहिवास करत असलेल्या मतदारानी एल.बी.टी शाखा शिवाजी मार्केट, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावेत किंवा आयोगाने विकसित केलेल्या https://voters.cci.gov.in/ यावर अथवा Voter Helpline App या अँपवर ऑनलाईन पध्दतीने सादर केल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.
.jpeg)