Kolhapur crime: बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करणार्‍यास अटक

 


कोल्हापूर, ( शेखर घोंगडे) : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेकायदेशीर हत्यारे विक्री करण्यास आलेल्या एका आरोपीस अटक केली आहे.  याप्रकरणी त्याच्याकडून ०१ गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र), ०३ जीवंत राऊंड व मोपेड असा १,५१,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

निवडणुकीच्या आचारसंहितादरम्यान अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे, विक्री व तस्करी करणार्‍यांवर कडक करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाणे प्रभारींना देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना कृष्णा सुरेश कलकुटकी (रा. खुपीरे, ता. करवीर) यांच्याकडे बेकायदेशीर पिस्टल असल्याची माहिती मिळाली. 

बुधवारी दुपारी कोल्हापूर येथील वीटभट्टी, दोनवडे फाटा, ता. करवीर येथे विक्रीकरिता पिस्टल व राऊंड आणल्याची माहिती मिळताच  सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासमवेत पथक तयार करून सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी त्यांच्या पथकासह  बुधवारी दोनवडे फाटा ते साबळेवाडी जाणारे रोडवरील वीटभट्टीचे ठिकाणी सापळा रचला. यामध्ये  कृष्णा सुरेश कलकुटकी (३८, रा. खुपीरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०१ गावठी बनावटीचे पिस्टल, ०३ जीवंत राऊंड व एक स्कूटर असा एकूण १,५१,५०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी कृष्णा सुरेश कलकुटकीविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post