डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना साऊथ इंडियन सेल व श्री मूकाबिका सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश मोरे यांचा डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना साऊथ इंडियन सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष शेट्टी, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा अनुपमा शेट्टी, साऊथ सेल शहर संघटक प्रकाश शेट्टी, विभाग संघटक बाळकृष्ण पुजारी, विभाग संघटक प्रेमा सुवर्णा,मल्लिका शेट्टी, आशा शेट्टी,रेखा शेट्टी,उषा शेट्टी,विजया शेट्टी,उपविभाग संघटक जयंती शेट्टी, अरुणा शेट्टी, ज्योती शेट्टी यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी शिवसेना साऊथ इंडियन सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका शिवसैनिकाला आमदार बनवल याचा सर्वांना आनंद होत आहे.तर ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा अनुपमा शेट्टी म्हणाल्या, आम्हाला खूप आनंद होत आहे की राजेश मोरे हे आमदार झाले. एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची मनापासून इच्छा आहे.