दिव्यात शिवसेनेच्या नगरसेवकांचे नवीन जनसंपर्क कार्यालय


 खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन 

नगरसेवक आदेश भगत, नगरसेविका दीपाली भगत जनसेवेसाठी तत्पर

दिवा \ आरती परब : दिवा शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तर कल्याण ग्रामीणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नगरसेविका दीपाली उमेश भगत आणि नवनिर्वाचित नगरसेवक ॲड आदेश भगत यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयांचे भव्य उद्घाटन पार पडले. उद्घाटनावेळी पुणेरी ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


या प्रसंगी विभागप्रमुख उमेश भगत यांच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते १० रिक्षांचे वाटप करण्यात आले. स्थानिक नागरिकांना, महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी देत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे विभाग प्रमुख उमेश भगत यांनी सांगितले. 


उद्घाटन समारंभास आमदार राजेश मोरे, दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, उपशहर प्रमुख, नगरसेवक शैलेश पाटील, उपशहर प्रमुख गणेश मुंडे तसेच नगरसेवक दीपक जाधव, बाबाजी पाटील, नगरसेविका स्नेहा अमर पाटील, अर्चना निलेश पाटील, साक्षी मढवी आदींसह विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शेकडो शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, भगत कुटुंबीयांच्या जनसंपर्क कार्यालयांमुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक वेगाने कार्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



Post a Comment

Previous Post Next Post