डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांची शिळ परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीला जनतेचा जोरदार पाठींबा मिळाला. उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या निवासस्थाना जवळचा भाग असल्याने नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली.त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चौक सभे दरम्यान उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी कल्याण ग्रामीण परिसराचा विकास साधण्यासाठी प्रचंड मताने जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणार असल्याचे सांगितले.
गेली अनेक वर्षे मुंब्रा, शिळ या परिसरातून नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने २०१४ साली बहुमतांनी आपण मला आमदार म्हणून निवडून दिलेत. गेली पाच वर्षे या भागाचा विकास खुंटला परंतु आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधान सभेत निवडून जाणार असल्याचे सांगून संपूर्ण कल्याण ग्रामीण मतदार संघाचा शाश्वत विकास करणार असल्याचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी सांगितले.
यावेळी प्रचार रॅलीमध्ये काँग्रेस कल्याण ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पाटील , माजी नगरसेविका सुलोचना हिरा पाटील, गुरुनाथ पाटील, बापू मखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कमरूल शेख, विभाग प्रमुख विश्वनाथ पाटील, वैकुंठ म्हात्रे, राष्ट्रवादीचे जफर सय्यद, कमरूल हुदा, सिराज कादीर, डॉ. इरशाद खान, करीम खान (के. के.), युवा उपजिल्हा अधिकारी स्वप्नील पावशे, युवासेनेचे राजू अन्सारी, प्रसाद पाटील,महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.