कोल्हापूरच्या शिवसैनिकांचे गणरायाला साकडे
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : जिल्ह्यातील महायुतीला नेत्रदीपक असं यश मिळाले. जिल्ह्यातून १० पैकी १० जागा जिंकत महायुती अभेदय बनली. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेले काम याचाच फायदा महायुतीला झालेला दिसून येत असून, जनतेच्या हिताचे, कल्याणाचे निर्णय घेणारे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी कोल्हापुरातील शिवसैनिकांनी गणरायाला साकडे घातले.
त्याचबरोबर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यांच्या योग्य नियोजनाने कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले यामुळे कोल्हापुरातील तमाम शिवसैनिकांनी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हावेत तसेच आमदार राजेश क्षीरसागर हे मंत्रिमंडळात उत्तम प्रकारचे मंत्रीपद मिळावे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ही व्हावेत यासाठी कोल्हापुरातील सिद्धिविनायक गणपतीला तमाम शिवसैनिकांनी साकडे घातले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमित साटम, संग्राम बावडेकर, प्रशांत नलवडे, विशाल पाटील,अक्षय घाटगे, कैलास मेढे, यश लोहार,व सर्व शाहूपुरी भागातील तरुण उपस्थित होते.