पालघर : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे महसूल विषयक प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी, जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी आणि डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” जिल्ह्यात ७ मार्च पासून सुरू होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) रणजीत देसाई, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील व तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.
शिबिरांचे कालावधी व ठिकाणे
मार्च ते मे दरम्यान महसूल मंडळ, नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर एकदिवसीय शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
शिबिरांमध्ये नागरिकांचे प्रलंबित महसूल प्रश्न तात्काळ सोडविण्यावर भर दिला जाईल.
डिजिटल उपक्रमाद्वारे Single Day Service Delivery अंतर्गत सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मंडळ स्तरावरील शिबिरे
७ मार्च, १४ मार्च
१० एप्रिल, १७ एप्रिल
नगर परिषद / नगर पंचायत स्तरावरील शिबिरे
८ मे, १५ मे
शिबिरांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये
भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर
प्रलंबित फेरफार सोडविणे
७/१२ उताऱ्यांमधील त्रुटी दुरुस्ती
डिजिटल ७/१२ उतारा (क्यूआर कोडयुक्त) डाउनलोड व कायदेशीर वैधता
उत्पन्न, रहिवासी, जातीचे तसेच नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण
ई-मोजणी, अँग्रीस्टॅक, पीएम किसान योजना व तक्रार निवारण
अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आवश्यक नाही; सनद प्रणाली रद्द, अधिमूल्य भरण्याची सुलभ व्यवस्था
प्रशासनाची व्यवस्था
Single Window Clearance प्रणाली अंतर्गत तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज तात्काळ स्वीकारून निर्णय देतील.
राज्यस्तरावर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत राहणार आहेत.
तालुका निहाय शिबिरांचे ठिकाण व दिनांक
पालघर तालुका:
७ मार्च: ग्रामपंचायत कार्यालय, भाजी मार्केट, माहीम
१४ मार्च: लाल बहादूर शास्त्री विद्यालय, मनोर
२० मार्च: ग्रामपंचायत कार्यालय, सफाळे
२७ मार्च: स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी विद्यालय, नागझरी
१० एप्रिल: डॉ. स. दा. वर्तक स्कूल, बोईसर
१७ एप्रिल: डॉ. होमी बाबा अणुऊर्जा सामुदायिक भवन, तारापूर
२४ एप्रिल: लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय, आगरवाडी
३० एप्रिल: ग्रामपंचायत कार्यालय, मनोर
८ मे: भगिनी समाज सभागृह, पालघर
१५ मे: जिल्हा परिषद शाळा, कोळगाव
वसई, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी तालुका यामधील शिबिरांचे ठिकाण व दिनांक तसेच निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महसूल विषयक प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे.

