डोंबिवली ( शंकर जाधव ) : 'ईव्हीएम हटाव देश बचाव ' असा नारा देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऑडिओ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये ईव्हीएम मशीन बंद करा,या मागणीसाठी डोंबिवलीत मोहीम राबविण्यात आली होती.
सह्याच्या मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे सोनिया इंगोले व चंद्रकांत पगारे यांनी सांगितले. ॲड. मिलिंद साळवे, उपाध्यक्ष अर्जुन केदार, अशोक गायकवाड, राजू काकडे, प्रताप हाणवते यांचे सहकार्य लाभले. तर आझाद समाज पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दामोदर काकडे यांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविला.