शासन दरबारी प्रलंबित असलेल्या कामांबाबत केली चर्चा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : आमदार सुलभा गायकवाड यांनी शुक्रवारी तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन कल्याण पूर्वेतील लोकोपयोगी विविध विकासकामे तसेच काही शासन दरबारी प्रलंबित असलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. ही विकासकामे तातडीने मार्गी लाऊन लवकरात लवकर योग्य न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, असे निवेदन आयुक्त डॉ. जाखड यांना दिले. आयुक् जाखड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
कल्याण पुर्वेतील तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप २४ मीटर (८०फूट) रस्त्याच्या बायोमेट्रीक सर्व्हेची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी तसेच कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप २४ मीटर (८०फूट) रस्त्याच्या काम जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न करावे व नागरिकांचे पुनर्वसन करावे. कल्याण पूर्व येथील १०० फुटी रोड लगत रुग्णालयाकरिता (आरक्षण क्र. २८३) आरक्षित असलेली ३०,००० चौ.मी. जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करून या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारण्याकरिता लागणारा निधीसाठीचा प्रस्ताव तातडीने राज्यशासनाकडे सादर करण्याबाबत कल्याण पूर्वेतील मराठा कोळशेवाडी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगण येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य शिवस्मारक होणे.
कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगण व त्या समोरील राजर्षी शाहू उद्यान हे एकत्र करून युटाईप रस्ता रुंदीकरण करतांना गणपती मंदिर चौक मराठा कोळशेवाडी ते सिद्धार्थनगर स्कायवॉक समांतर रस्ता तयार करणे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर व पाणी बिलाची थकबाकी असणाऱ्या करदात्यावर आकारण्यात येणारे दंड/व्याज १००% माफ करण्यासाठी अभय योजना सुरु करणे. कल्याण पूर्व येथील १०० फुटी रोड लगत क्रीडासंकुल आरक्षण क्र. २७९ आरक्षित जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया नगररचना विभागाच्या दिरंगाईमुळे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने सदरची जमीन अधिग्रहण प्रक्रिया तातडीने सुरु करणे. तसेच क्रीडासंकुल उभारण्याकरिता लागणारा निधीसाठीचा डी.पी.आर. त्वरित राज्य शासनाकडे सादर करावा. कल्याण पुर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार परिसरामधील पाणी समस्या तसेच अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाइन टाकणे व जलकुंभ बनविण्याचे संथ गतीने सुरू आहे.
चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार या नव्याने समाविष्ठ झालेल्या ग्रामीण भागात पथदिवे बसविणे. आरडीएसएस योजने अंतर्गत प्रस्तावित उपकेंद्र महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीला २२/११ के.व्ही. उपकेंद्रासाठी ३००० चौ.मी. जागा उपलब्ध करून देणे. कल्याण पूर्वेतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग क्र.१०० तिसगाव गावठाण, सर्व्हे नं.८६ आरक्षण क्र.४४३ येथे जलकुंभ तातडीने बनविणे. नवी मुंबई महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याधर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील ५०० चौरस फुटापर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास पाठविणे.
गेल्या पाच वर्षांपासून (R&B) आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या ठेकेदारामार्फत कल्याण पूर्वेतील “४-जे” प्रभाग क्षेत्र अंतर्गत घनकचरा विभागात कार्यरत ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समावून घेणे. कल्याण पूर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार परिसरामधील पाणी समस्या तातडीने सोडवण्यासाठी योग्य त्या उपयायोजना करण्याबाबत तसेच पाणी समस्या संपुष्टात येईपर्यत दररोज टॅकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करावा, अशा मागण्या आमदार सुलभा गायकवाड यांनी निवेदनाद्वारे मांडल्या.