अलिबाग (धनंजय कवठेकर ): गोव्यात नुकतीच पाचवी राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खेळाडूंनी १५ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य अशी एकूण २० पदके मिळवली.
आठ वर्षाखालील मुलींच्या गटात रुद्रा अंकिता विनय पिळणकर एकम लाठीमध्ये १, व्दिलाठी प्रकारात १ , द्विअनिकामध्ये १ अशी एकूण तीन सुवर्ण पदके पटकावली. अवनी पाटील द्विलाठी आणि पंचम लाठी प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. सिमरन ठाकूरने द्विअनिका व पंचम लाठीमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. ऋचा पाटीलने द्विअनिका व पंचमलाठी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. ओवी भिंवडेने द्विअनिका व पंचमलाठीमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. आराध्या नखातेने द्विअनिका व पंचमलाठीमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. श्लोक जाधवने एकमलाठीमध्ये रौप्य, काठपवित्र प्रकारात सुवर्ण व द्विलाठीत रौप्य पदकाची कमाई केली. श्रेयस म्हात्रे एकलाठीमध्ये रौप्य, शिवम संदेश गुंजाळने एकमलाठ व द्विलाठीत सुवर्ण पदक जिंकले. अर्णव पाटील द्विलाठीत सुवर्ण तर काट पवित्र प्रकारात कांस्य पदक मिळवले.
लाठी असोसिएशन अलिबाग रायगडचे अध्यक्ष प्रमोद मसाला यांनी अभिनंदन केले. प्रियंका संदेश गुंजाळ, वेदांत सुर्वे, शुभम नखाते यांचे मार्गदर्शन लाभले.