डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याणमध्ये आलेले जैन समाजाचे परमपूज्य आचार्य श्री विजय प्रभाकर सुरिश्वरजी महाराज यांचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विश्वनाथ भोईर यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून आल्याबद्दल आचार्य सुरिश्वरजी महाराज यांच्याकडून आमदार विश्वनाथ भोईर यांचा सन्मान करण्यात आला.
आचार्य सुरिश्वरजी महाराज यांनी विश्वनाथ भोईर यांना यावेळी आशीर्वाद देत लवकरच मंत्रीपदी आपली नियुक्ती होईल असे आशीर्वाद दिले. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात हिंदू धर्माच्या वाढीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे अभिवचन विश्वास आमदार भोईर यांनी परमपूज्य आचार्य सुरिश्वरजी यांना दिले.
यावेळी आचार्य श्री विजय प्रभाकर सुरिश्वरजी महाराज, मुनी प्रवर श्री महा पद्मविजयजी मुनी प्रवर श्री पद्मविजयजी यांच्यासह कल्याणातील नामांकित उद्योजक नितीन जैन आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.