अभिजीत पाटील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी

 



ठाणे जिल्ह्यातील २२ वर्षाचा अभिजीत राजस्थानची सांभाळतोय जबाबदारी 


दिवा \ आरती परब  : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर संयम, चिकाटी आणि आत्मविश्वासाची अंतिम कसोटी! अनेक उमेदवार वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही अपयशी ठरतात.  मात्र महाराष्ट्राच्या ठाण्याचा अभिजीत पाटील याने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी, पहिल्याच प्रयत्नात ही कठीण परीक्षा जिंकून दाखवली आहे! पहिल्याच प्रयत्नात ऐतिहासिक यश, अभिजीत पाटील याने UPSC CSE २०२२ मध्ये अखिल भारतीय ४७० वी रँक मिळवली. विशेष बाब म्हणजे कोणतेही कोचिंग क्लास न लावता, केवळ स्व-अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले! २०२३ बॅचचा IPS अधिकारी म्हणून तो आज राजस्थान कॅडरचा सर्वात तरुण IPS अधिकारी ठरला आहे. 


सध्या तो राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील राजगड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून कर्तव्य बजावत आहे. महाराष्ट्राची माती, देशसेवेची जिद्द,अभिजीतचा जन्म ११ जून १९९९ रोजी ठाणे येथे झाला. वडील तुळशीराम पाटील मुंबई महानगरपालिकेतून मुख्य लेखापरीक्षक म्हणून निवृत्त आई आशा देवी सिंचन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेला अभिजीत, संस्कार, शिस्त आणि मेहनतीच्या मूल्यांवर घडलेला तरुण आहे. 


इतक्या कमी वयात कायदा व सुव्यवस्था सांभाळत, अभिजीत पाटील तरुणांसाठी एक जिवंत प्रेरणा ठरत आहे. देशातील सर्वात तरुण IPS अधिकाऱ्यांमध्ये सफीन हसन यांच्यासोबत आज अभिजीत पाटील यांचेही नाव अभिमानाने घेतले जाते!

Post a Comment

Previous Post Next Post