डोंबिवली रेल्वे स्थानकात यमदुताच्या वेशभूषेत पोलिसांनी केली जगनजागृती
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मध्य रेल्वे स्थानकात सर्वात जास्त गर्दीचे आणि जास्त उत्पन्न देणारे स्थानक आहे. या स्थानकातून डोंबिवली शहरातील ६० टक्के चाकरमानी मुंबईत कामासाठी जातात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी वर्ग असून रेल्वे प्रशासनाचे नियम व कायदे मोडणारे कम नाहीत. रेल्वे स्थानकात सिसिटीव्ही कॅमेराची नजर असूनही रेल्वे रूळ ओलांडणे,धावत्या रेल्वेगाडीत चढणे अथवा उतरणे,गर्दी नसतानाही दरवाज्याजवळ उभे राहणे यामुळे रेल्वे अपघात होतात. डोंबिवली रेल्वे स्थानकात वपोनि किरण उंदरे यांच्या देखरेखीखाली पोलिसांचे डोंबिवली रेल्वे स्थानकावर बारीक लक्ष असते.लोहमार्ग पोलिसांनी 'झिरो एक्सीडेंट" मोहिम सुरु केली असून या मोहिमेतर्गत डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याकरता डोंबिवली लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त मोहिमेत शनिवारी रेल्वे सुरक्षा बलाचे अंमलदार गायकवाड यांनी यमदूताच्या वेषभुषेत रेल्वे स्थानकात जनजागृती केली.
झिरो एक्सीडेंट" मोहमेअंतर्गत प्रवाशांनी रेल्वे लाईन क्रॉस करू नये,ओव्हरब्रिजचा वापर करावा, प्रवाशांनी चालते ट्रेन पकडून प्रवास करू नये, प्रवाशांनी चालत्या ट्रेन मधून उतरू नये, लोकलचे बाहेर फुटबोर्ड वर लटकून प्रवास करू नये आवाहन मेगाफोन द्वारे प्रवाशांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत लोहमार्ग पोलिसांनी केले. रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या लोकलमध्ये चढताना अथवा उतरताना होणारे अपमृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता जनजागृती करताना प्रतिकात्मक पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आले.
यावेळी वपोनि किरण उंदरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल व रेल्वे सुरक्षा बल डोंबिवलीचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र राऊत ,उपनिरीक्षक मनोरे, डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या झिरो एक्सीडेंट' मोहिम राबविली.
