कल्याण युवा सेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांचा उपक्रम
डोंबिवली ( शंकर जाधव ) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शनिवारी 'युवासेना शाखा संपर्क अभियान' डोंबिवली पश्चिम येथे कल्याण युवा सेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत वार्ड क्रमांक -५९ भागशाळा, वार्ड क्रमांक -४८ गणेश नगर,वार्ड क्रमांक -६१ विष्णू नगर,वार्ड क्रमांक -५० गरीबाचा वाडा,वार्ड क्रमांक -४९ राजू नगर,वार्ड क्रमांक -५८ प्रसाद सोसायटी,वार्ड क्रमांक -५१ महाराष्ट्र नगर,वार्ड क्रमांक -५२ देवीचा पाडा,वार्ड क्रमांक-५६ गावदेवी सोसायटी इथे भेट देऊन तेथील स्थानिक पदाधिकारी आणि युवसैनिकांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस योग्य ते मार्गदर्शन केले व या अभियानाला स्थानिक युवकांसोबत महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी मध्ये युवकांचे शिवसेनेला मिळालेला भक्कम पाठिंबा हा वेळोवेळी पाहायला मिळत होता. माझ्या अध्यक्षतेखाली याच युवकांना राजकारणामध्ये आपल युवा कौशल्य सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावं तसेच येणाऱ्या काळात युवासेना अधिक बळकट करून प्रचंड ताकदीने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहावी या हेतूने तसेच अनेक युवा युवतीना शिवसेना पक्षामध्ये समाज सेवा करण्याची संधी मिळावी या हेतूने " युवा सेना व सोशल मीडिया सदस्य नोंदणी अभियान " देखील राबविण्यात आले आणि याचाच फायदा येणाऱ्या काळात मजबूत पक्ष बांधणीसाठी होईल असा विश्वास यावेळी कल्याण युवा सेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी राहुल श्रीधर म्हात्रे (युवासेना जिल्हा सचिव ), सागर जेधे (युवासेना शहर अधिकारी ), सागर दुबे (विधानसभा अध्यक्ष), कविता गावंड (महिला आघाडी संघटक ), दिनेश शिवलकर (उप शहर प्रमुख ), अक्षय मारुती सुर्वे (सोशल मीडिया शहर प्रमुख ), प्रकाश माने (डोंबिवली शहर कार्यालय प्रमुख तथा माजी नगरसेवक )शिवसैनिक, महिला आघाडी, शाखा प्रमुख आणि अनेक स्थानिक नागरिक उपस्तिथ होते.



