कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : शाहूपुरी येथील कावळा नाका परिसरात राहणारे अशोक खांडेकर हे बुधवारी रात्री जेवण करून पान खाण्यासाठी लिशा हॉटेल परिसरातील एका पानपट्टीवर थांबले होते. यावेळी या ठिकाणी आलेल्या दोघा अज्ञातांनी खांडेकर यांना त्यांच्याच दुचाकीवरून रुईकर कॉलनी परिसरात असणाऱ्या एका मैदानावर नेऊन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन चाकूचा धाक दाखवून दोघेजण खांडेकर यांची मोपेड घेऊन पळून गेले होते.
या प्रकरणी अशोक खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघा आज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाहूपुरी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी विचारे माळ परिसरातील पियुष शंकर पोवार आणि आदर्श उर्फ पिल्या गायकवाड या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या दोघांकडून एक मोपेड आणि चाकू असा सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार संदीप जाधव मिलिंद बांगर महेश पाटील विकास चौगले रवी आंबेकर सनीराज पाटील बाबा ढाकणे सुशील गायकवाड यांनी मिळून केलिय शाहूपुरी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयान त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.