राज्य निवडक चाचणी तिरंदाजी स्पर्धेला प्रारंभ

Maharashtra WebNews
1

 



अलिबाग (धनंजय कवठेकर ): फिल्ड आर्चरी ओसोसिएशन ऑफ  महाराष्ट्र यांच्यातर्फे  फिल्ड आर्चरी ओसोसिएशन ऑफ रायगड  यांच्या यजमानपदाखली  आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या  महाराष्ट्र राज्य  फिल्ड इनडोअर तिरंदाजी निवड चाचणी स्पर्धाला प्रारंभ झाला.


जिल्हा क्रीडा संकुल नेहुली , अलिबाग ही स्पर्श खेळली जात आहे.  शनिवारी (दि . १४)  रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर , जिल्हा क्रीडा अधिकारी राजेमदर अतनूर , फिल्ड आर्चरी ओसोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव सुभाषचंद्र नायर , फिल्ड आर्चरी ओसोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष रितिका नायर , वेश्र्वी ग्राम पंचायतीचे सरपंच गणेश गावडे, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगडचे सचिव संतोष जाधव, मिलिंद पांचाळ , वैभव सागवेकर, अजिंक्य अडकर, लाभेश तेली आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते


या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. या संघ उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सहभगी होणार आहे.




Post a Comment

1Comments

Post a Comment