Sunil Pal : अभिनेता सुनील पाल अपहरणाच्या तपासासाठी १० पथके तैनात

Maharashtra WebNews
0

 



मेरठ : प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता सुनील पाल याचे अपहरण करून आठ लाखांची खंडणी वसूल करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा सुगावा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. खंडणीच्या पैशातून दागिने खरेदी करणारे आरोपी बिजनैर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.  याप्रकरणी एसएसपी डॉ. विपिन टाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी १० पथके तैनात करण्यात आले  असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.  हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल, असे एसएसपी यांनी सांगितले. 


सुनील पाल यांना दिल्लीहून हरिद्वारला घेऊन गेलेल्या कारचालकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. हे प्रकरण मीडियाच्या माध्यमातून उजेडात आल्यानंतर मेरठ पोलीस सतर्क झाले होते. मात्र, त्यापूर्वीच लालकुर्ती परिसरातील सराफ अक्षित सिंघल यांनी आपले खाते गोठवल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.


 पोलिसांनी अनेक मुद्द्यांवरून या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर पोलिसांना आरोपी आणि चालकाचा सुगावा लागला. सराफच्या सीसीटीव्हीत कैद झालेल्या आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे फुटेज आजूबाजूचे जिल्हे आणि पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले. त्याचबरोबर आरोपीचे फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)