मनसे साबेगाव शाखा अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न

 



माऊली ऑप्टिकल आणि स्वामी सर्वांनंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत माफक दरात चष्मे वाटप 


दिवा, (आरती परब) :  मनसे शाखा अध्यक्ष व समाजसेवक सयाजीराव तुकाराम चव्हाण सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरातील नागरिकांसाठी शनिवार व रविवार दोन दिवस मोफत डोळे तपासणी शिबिर व माफक दरात चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे समाजसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्या प्रमाणे मुंब्रा कॉलनी येथील लक्ष्मी वृद्धाश्रमात अन्नदान ही करण्यात आले.


या शिबिरात मोफत डोळे तपासणी व माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले. साबे गावातील आणि आजू बाजूच्या विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिराला लाभला. दोन दिवस असणाऱ्या या शिबिराला शनिवारी सकाळपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. नागरिकांचा वाढता प्रतिसाद बघून रविवार रात्री ८ पर्यंत हा कॅम्प सुरु होता. दिव्यातील ४५६ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. तर १०४ चष्मे स्वस्त दरात नागरिकांनी वाटप करण्यात आले.


यावेळी मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, विभाग सचिव परेश पाटील, उद्योजक संकेत चव्हाण, शाखाध्यक्ष नम्रता खराडे, शाखा अध्यक्ष गणेश आवटे, दिनेश महाडिक, सतीश गजाकोश, राणी वाघमारे, उपशाखा अध्यक्ष कल्पेश कोंडविलकर, अक्षय धाडले,रणजित कडु, निनाद कासारे, सह्याद्री चहाचे मालक उद्योजक प्रसंगी इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post