मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी कै. मेघना कीर्तीकर यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी शिवधाम स्मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा अमोल कीर्तीकर, मुली गौरी पाठारे, हर्षदा मोरे, सून सुप्रिया कीर्तिकर, नातवंडे चि. हर्षवर्धन, जान्हवी, अथान, उत्तरा असा परिवार आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उपसभापती निलम गो-हे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार रविंद्र वायकर, माजी खासदार आनंदराव अडसुळ, आमदार विद्या जयप्रकाश ठाकूर, आमदार सुनिल प्रभु,आमदार अँड.अनिल परब,आमदार प्रकाश सुर्वे, आमदार अनंत नर, मा. आ. विनोद घोसाळकर, मा. आ.विलास पोतनीस, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम, माजी आमदार अभिजीत अडसूळ तसेच शिवसेना, भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व आरपीआयचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पार्थीवाचे अंत्यदर्शन घेतले व कीर्तीकर कुटुंबियांचे सांत्वन केले.