राणे प्रतिष्ठानच्या ठाणे अध्यक्षपदी दिव्यातील नितीन कोरगांवकर



दिवा, (आरती परब) :  कुडाळ मालवणचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या आदेशावरून नितीन कोरगांवकर यांची राणे प्रतिष्ठानच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नितीन कोरगांवकर हे भाजपा दिवा- शीळ मंडळाचे उपाध्यक्ष असून सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवा भावी संस्था, दिवा शहर या सामाजिक संस्थेचे ही ते अध्यक्ष आहेत.

 या दोन्ही जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्याने निलेश राणे यांनी बघूनच राणे प्रतिष्ठानचे मोठे पद कोरगावंकर यांना दिले. त्याबद्दल नितीन कोरगांवकर यांनी राणेंचे मनापासून आभार व्यक्त करुन त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावून राणे प्रतिष्ठान ही संघटना लोकांच्या मनातच नाही तर घराघरा पर्यंत पोचवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन याची ग्वाही त्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post