महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांच्या दिनदर्शिकेचे संजय वाघुले यांच्या हस्ते आनावरण

 


दिवा, (आरती परब) : भारतीय जनता पार्टी दिवा- शीळ मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत आणि ठाणे कार्यकारणी सदस्य तथा प्रभाग २८ चे अध्यक्ष रोशन प्रभाकर भगत यांच्या दिनदर्शिका २०२५ चे आनावरण भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी कार्यालय, ठाणे येथे उत्साहात झाले.


हे दिनदर्शिका काढण्याचे भाजपा, दिवा- शीळ महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत यांचे पहिले वर्ष असले तरी त्यांनी सामान्य नागरिकांसाठी केलेल्या मदतीची, त्यांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करण्याची माहिती, सामाजिक उपक्रम, नागरी समस्या सोडवल्याची माहिती या दिनदर्शिकेमध्ये पहायला मिळणार आहे. त्यावेळी ठाणे कार्यकारणी सदस्य जिलाजित तिवारी, दिवा- शीळ मंडळ उपाध्यक्ष नितीन कोरगांवकर, विठ्ठल गावडे, उदय सावंत, राकेश पांडे, विकास साळगांवकर, गणेश सावंत तसेच महिला मोर्चाच्या मंगल राणे, रिना सिंग, मनीषा शालबिंद्रे, पूनम शालबिंद्रे इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post