डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी या दोघांना पोलिसांनी अटक केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात या गुन्हाचा खटला भरविण्यात आला असून साक्षीच्या वकीलाने सुनावनीपूर्वीच वकीलपत्र मागे घेतले. या गुन्हातील तपास पुढील टप्प्यात असून मोबाईल डेटा, सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड), आणि अन्य पुरावे तपासून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल गवळीने आपला मोबाईल शेगाव येथे लॉज मालकाला विकल्याची माहिती समोर आली आहे. त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह ज्या बॅगेत भरून बाप गावात टाकण्यात होता, ती बँग अद्याप पोलीसांना सापडली नाही. आरोपी विशाल गवळीने ती बॅग कुठेतरी लपवून ठेवली असल्याचा संशय पोलीसांना आहे. आरोपी साक्षीने न्यायालयात वकील देण्याची विनंती केली असून न्यायालयाने तिला सरकारी वकिल देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशाल गवळीला २५ तारखेला अटक करण्यात आली होती, त्यानंतर तो ९ दिवस पोलीस कोठडीत होता. साक्षी गवळीला २ दिवस आधी अटक करण्यात आली असून ती १० दिवस पोलीस कोठडीत होती. पोलिसांनी विशाल गवळीच्या मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये अत्यंत संवेदनशील माहिती असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मोबाईलमधील डेटा तपासण्यासाठी पोलिसांनी पुन्हा ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने ती नाकारली आणि दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवले.
विशाल गवळीने आपला मोबाईल शेगाव येथे लॉज मालकाला विकल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित लॉज मालकाने पोलिसांशी संपर्क साधला असून मोबाईल लवकरच पोलिसांच्या ताब्यात येणार आहे. मोबाईलमधील ईमेल लॉगिन, सोशल मीडिया आयडी, आणि अन्य डेटा तपासून आरोपींच्या विकृत वर्तनाची चौकशी होणार आहे. आरोपी विशाल गवळीचे वकील यांनी धमकी मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना सोशल मीडियावर त्रास दिला जात असल्याने त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
