मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन




 महापालिका कर्मचारी वर्गाचा लक्षणीय सहभाग 

कल्याण, ( शंकर जाधव ):  शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  या पंधरवडयाचा शुभारंभ दि.१७ जानेवारी रोजी डोंबिवली पूर्व येथील गावदेवी उद्यानात संपन्न झाला. यावेळी उपस्थित खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे तसेच महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड‌ यांनी या उद्यानात उपस्थित असलेल्या नागरिकांना आणि मराठी भाषा पंधरवडयाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यर्थ्यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त शुभेच्छा दिल्या.


मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात महापालिका अधिकारी /कर्मचा-यांचा देखील जास्तीत जास्त सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून महापालिकेने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मराठी गीत गायन, मराठी हस्ताक्षर स्पर्धा, चारोळी स्पर्धा आणि महापालिकेच्या शालेय विदयार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धा, म्हणी, वाकप्रचार स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.


यापैकी दि.२१ रोजी आयोजित करण्यात आलेली मराठी गीत गायन स्पर्धा, आज दि.२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर स्पर्धेस महापालिका अधिकारी /कर्मचारी वर्गाने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा दि.२८ जानेवारी २०२५ रोजी कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क येथे संपन्न होणार असल्याची माहिती मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी दिली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post