अलिबाग, ( धनंजय कवठेकर ) : प्रखर साईभक्त असलेले चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सालाबादप्रमाणे आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवारांसह सोमवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी श्री. साईधाम मंदिर, रांजणपाडा तर्फे आयोजित श्री. साईबाबा पालखी प्रस्थान सोहळ्याचे चोंढी येथे सालाबादप्रमाणे आगमन झाल्यानंतर साईबाबा पालखीचे भव्य स्वागत करीत दर्शन घेतले.
श्री. साईधाम पालखी पदयात्रा सेवा संस्थेची साईबाबांची पालखी सालाबादप्रमाणे रांजणपाडा ते शिर्डी वारीचे सोमवार दि. ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ :३० वाजता रांजणपाडा येथून प्रस्थान झाले होते. या पालखी पदयात्रेचे चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवारांसह चोंढी येथे भव्य स्वागत करत दर्शन घेतले. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व साईभक्तांना मोठ्या भक्तिभावाने सरपंच पिंट्या गायकवाड यांनी चहा, पाणी, नाष्टा असे अल्पोपहार दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचा श्री. साईधाम पालखी पदयात्रा सेवा संस्था रांजणपाडा यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर पिंट्या गायकवाड यांनी काही अंतर साईबाबांची पालखीची भोई वाहिली, तसेच सर्व साईभक्तांना पुढील पालखी पदयात्रेच्या भक्तिमय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सदर श्री. साईधाम पालखी सेवा संस्थेचे १२ वे वर्ष असून सोमवार दि. ६ जानेवारी २०२५ रोजी निघालेली पालखी मंगळवार दि. १४ जानेवारी २०२५ रोजी शिर्डी येथे पोहोचणार असल्याचे सहभागी झालेल्या साईभक्तांनी सांगितले आहे.
यावेळी चोंढी येथे पालखीचे दर्शन घेण्यासाठी सरपंच पिंट्या गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड, सासवणे ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील तसेच सुदेश सावंत, विनोद भोईर, विजय भोईर, अंकुश साळुंखे, आप्पा साळुंखे, निवेदिता भोईर, पंकज भोईर, सागर भोळे, सोनाली भोईर, पिंट्या गायकवाड मित्रमंडळाचे सदस्य व चोंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.