दिव्यात ‘रुकिआरा’ मल्टिक्युझिन रेस्टॉरंटचा दिमाखात शुभारंभ!



यशोदा बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; निलेश पाटील यांनी नव्या व्यावसायिक क्षेत्रात टाकले पाऊल

दिवा \ आरती परब  : दिवा पूर्वेतील साबेगाव परिसरात खाद्यप्रेमींसाठी नव्या रेस्टॉरंटची भर पडली आहे. ‘रुकिआरा’ मल्टिक्युझिन रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यशोदा बाळाराम पाटील यांच्या हस्ते फीत कापून या रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी यशोदा पाटील, अर्चना पाटील, निलेश पाटील, रुद्र पाटील, कीयारा पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


नव्या व्यवसायाची सुरुवात करताना निलेश बाळाराम पाटील यांनी सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आपण या नव्या क्षेत्रात पाऊल टाकत असल्याची भावना व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

दिवा पूर्वेतील यशोदा बाळाराम पाटील नगर, डी.जी. कॉम्प्लेक्स, रुद्र गॅलेक्सी, साबेगाव येथे सुरू झालेल्या या रेस्टॉरंटमुळे परिसरातील नागरिकांना खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. नव्या व्यावसायिक उपक्रमाच्या प्रारंभानिमित्त पाटील कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post