सलमान खानला गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेसंबंधी अधिक महत्त्व दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनी बुलेटप्रूफ काचेने संरक्षित केल्याचे पहावयास मिळत आहे.
सलमान खानची सुरक्षा लक्षात घेता त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. याशिवाय गॅलेक्सी अपार्टमेंटच्या प्रत्येक बाजूला हाय सिक्युरिटी ट्रेसरही लावण्यात आले आहेत. वास्तविक, सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काचेची भिंत बांधण्यात आली आहे. यासोबतच खिडक्यांना बुलेट प्रूफ काचही लावण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही उच्च तंत्रज्ञान सुरक्षा उपकरणेही बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर सलमान खानच्या सुरक्षेसाठी घराबाहेर हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. तसेच घरासमोरच पोलिसांनी चौकी उभारली आहे.
गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी सलमान खानच्या घराबाहेर ५ राउंड फायरिंग करण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.