विद्यार्थिनीं व महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण

Maharashtra WebNews
0


अलिबाग (धनंजय कवठेकर) :  गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने रा.जि.प. शाळा, देऊळ भेरसे येथील विद्यार्थिनींसाठी व महिलांसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप गुप्ता - मुख्य महाप्रबंधक पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल उसर व जितिन सक्सेना - महाप्रबंधक, शितल लाकरा - मुख्य प्रबंधक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अस्मिता अमरदीप साळुंके- मुख्याध्यापिका रा.जि.प शाळा, देऊळ भेरसे यांच्या हस्ते करण्यात आले. 





यावेळी या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, शुभांगी उल्हास राणे- उपशिक्षिका, स्थानिक महिला अश्विनी राकेश पाटील, साधना रुपेश पाटील, स्वयंसिद्धा प्रशिक्षिका प्रणाली तळेगावकर, मनीषा माने, दिव्या शिंदे, निकी बेंडे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. स्मिता साळुंके मॅडम यांनी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या मुलींना शुभेच्छा देत स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगितले. गेल इंडिया लिमिटेड उसर यांच्या वतीने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल तसेच त्यांनी तपस्वी गोंधळी यांच्या कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थिनींना देत प्रिझम सामाजिक विकास संस्थेस शुभेच्छा दिल्या तर तपस्वी गोंधळी यांनी या पाच दिवसाच्या स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरामध्ये कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणास देऊळ भेरसे येथील विद्यार्थी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)