सिंधुदूर्ग चषक भिवंडीतील शिवलिंग संघाने पटकाविला

 


उपविजेतापदी भांडुपमधील फायटर संघ


डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीत पार पडलेल्या सिंधुदुर्ग चषक २०२५ चे विजेतेपद भिवंडीतील शिवलिंग संघाने पटकाविले. तर उपविजेतेपद भांडुपमधील फायटर संघाला मिळाले. डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवलीतील मैदानात पार पडलेल्या स्पर्धेत उकृष्ठ गोलंदाज प्रशांत घाडी, उकृष्ठ फलंदाज लवलेश कांबळी तर या स्पर्धेचा मालीकावीर ७८ फायटर भांडुप संघाचा दिपक सावंत ठरला असून त्याला एल, ई, डी टीव्ही देण्यात आले.




   स्पर्धेत आमदार रवींद्र चव्हाण, स्थायी समिती माजी सभापती तथा माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक नगरसेवक संजय पावशे, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.


या स्पर्धेत २४ संघांनी भाग घेतला होता. प्रसाद परब व सिद्धेश परब, मनीष बागवे, सिद्धेश काष्ठे यांनी मालवणी, मराठी हिंदी भाषेत समालोचन केले.यात विशेष म्हणजे निसर्गाने नटलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महत्व असणाऱ्या ठिकाणाची, आजही कोकणवासिय ज्या वाहणातून प्रवास करत आपल्या गावाला जाण्याचा आनंद घेतात ती लालपरी अर्थात एसटी, मालवणातील प्रसिद्ध अभिनेता मंच्छिन्द्र कांबळी, भराडी देवी मंदिर, कुणकेश्वर मंदिर, चिपी विमानतळ,सिंधुदुर्ग किल्ला यांचे मंहित देणारे चित्र लावण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post