डम्परने वृद्धाला चिरडले



अंबरनाथ, ( अशोक नाईक ) : अंबरनाथमध्ये डम्परच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर घडली आहे. दरम्यान याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी डम्परचालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. 


अंबरनाथच्या पश्चिम भागातील मटका चौकाकडून पूर्व भागातील हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर शनिवारी सकाळच्या सुमारास डम्परच्या मागच्या चाकाच्या खाली येऊन एका ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. चिंतामण महादू रसाळ असे त्या वृद्धाचे नाव असून ते म्हारळ गावचे रहिवासी होते. रसाळ हे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत कामाला होते. शनिवारी सकाळी दुपचाकीवरून कामावर जात असतानाच अंबरनाथच्या उड्डाण पुलावर त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी डम्परचालक संजय निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post