कल्याण, ( शंकर जाधव ) : महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार १/अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी बल्याणी, उंभारणी आणि मोहिली येथील ३७ खोल्यांचे वीट बांधकाम, ३ वाणिज्य गाळे आणि ७९ जोत्यांचे फाऊंडेशन जमीनदोस्त केले. तसेच ७८ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची देखील कारवाई केली.
सदर कारवाई महापालिका पोलीस अधिकारी/कर्मचारी, स्थानिक पोलीस अधिकारी /कर्मचारी, अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व ५ मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली. सदर कारवाई उद्या व परवा देखील सुरु राहील, अशी माहिती १/अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली आहे.