शिवसेना दिवा शहर युवती अधिकारी साक्षी मढवी यांचा स्तुत्य उपक्रम
दिवा / आरती परब : जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना दिवा शहर आयोजित हळदी कुंकू व होम मिनीस्टर, खेळ पैठणीचा तसेच सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी अनेक कर्तबगार महिलांचा सन्मान व गौरव करण्यात आला.
महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आणि सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले. विजेत्या महिलांना टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, सौंदर्यप्रसाधन साधने आदी शेकडो पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महिलांनी सहभाग घेत आपली उपस्थिती दर्शवली. तर शेकडो महिलांनी बक्षिसांची लयलूट केली. युवती अधिकारी साक्षी रमाकांत मढवी यांच्या उत्कृष्ट नियोजनाने उपक्रम यशस्वी पार पडला. सामाजिक जीवनात पुरुषांप्रमाणेच महिलांचही मोलाचं योगदान देतात हे दिसून आले.
प्रसंगी व्यासपीठावर सरिता रमाकांत मढवी, नगरसेविका दिपाली उमेश भगत, दर्शना चरण म्हात्रे, सुनीता गणेश मुंडे, भाग्यश्री गुरुनाथ पाटील, सुप्रिया भगत तर इतर महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदक विवेक पोरजी यांनी केले तर रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती.