दिव्यात छुप्या पद्धतीने डंम्पिंग सुरू

Maharashtra WebNews
0

 



कचरा गाड्या मनसेने ५ तास रोखल्या


दिवा / आरती परब : दिव्यात छुप्या पद्धतीने पुन्हा डम्पिंग सुरू झालेले मनसेने उघड केले आहे. दिव्यात काही भागात ठाणे मनपाकडून कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. मुंब्रा - दिवा शहराला जोडणारा चूहा पुल वरून कचऱ्याचे डम्पर आणून ते साबे गाव आणि खाडी किनारी टाकून भराव करताना दिसत आहेत. ही छुप्या पद्धतीने सुरू असलेली डम्पिंग बंद करण्यासाठी मनसेने ५ तास कचऱ्याच्या गाड्या अडवल्या होत्या. 



दिव्याच्या खाडी किनारी दररोज कचऱ्याच्या गाड्या येऊन खाडी किनारी त्या रिकाम्या केल्या जात आहेत. मात्र या गाड्या नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आल्या आहेत, याची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पुन्हा कचरा टाकण्यास नव्या विरोधाला दिवा मनसेच्या वतीने सुरुवात झाली आहे. सुरवातीस दिवा, डायघरनंतर भंडार्ली येथे डम्पिंगला विरोध झाल्यावर आता छुप्या पद्धतीने हे नवीन डम्पिंग सुरू झाल्याचे दिसल्याने दिवा मनसे आक्रमक झाली असून मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी सदर डम्पिंगला जाणाऱ्या व येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या ५ तास रोखल्या होत्या.



ठाणे मनपाकडून दिवा खाडी किनारी टाकला जाणारा कचरा हा नक्की कोणाचा आणि तो कोणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात येत आहे, हे अजून ही कळाले नसल्याने सदर ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांची कुळ कायदा जमीन असून कचरा टाकण्याला विरोध करणार असल्याचे मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील व मुंब्रा येथील शेतकरी गणेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आता संघर्ष पेटण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. नव्या डम्पिंगमुळे दिवेकरांमध्ये नाराजी वाढत आहे.



कल्याण ग्रामीण भागातील वाढत्या कचरा कोंडीमुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित होणार आहे. मात्र दिव्यातील डम्पिंग बंद केल्यांनतर आता पुन्हा नवे डम्पिंग सुरु झाले नाही ना? असा प्रश्न उपस्थित नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. तसेच खाडी किनारी असलेल्या जैवविवीधतेला धोका निर्माण झाला आहे. तर या कचऱ्याच्या गाड्या कोण थांबवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असून टाकण्यात येणारा कचरा कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता खाडीत टाकण्यास सुरुवात झाली असून दिवा मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील व मुंब्रा येथील शेतकरी गणेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आम्ही न्यायालयीन संघर्ष करू असे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)