जळगावमध्ये ग्रामस्तरीय नेतृत्व अधिक सक्षम करण्यावर भर


सरपंच संवाद प्रशिक्षण कार्यक्रम

जळगाव: ग्रामस्तरीय नेतृत्व अधिक सक्षम करून शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे “सरपंच संवाद- प्रशिक्षण कार्यक्रम व स्वच्छ संकल्प पुरस्कार” आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला असून ग्रामपातळीवरील प्रशासन सुदृढ करणे, स्थानिक नेतृत्वाला बळकटी देणे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

कार्यक्रमात सहभागी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन घेतले.ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) प्रभावीपणे तयार करणे. स्थानिक शाश्वत विकास उद्दिष्टांशी संलग्न नियोजन करण्यावर भर देण्यात आला. जलसुरक्षा, हवामान-संवेदनशील शेती, घन व द्रव कचरा व्यवस्थापनावर, भूजल संवर्धन, उष्णता व्यवस्थापन, डिजिटल साधनांच्या माध्यमातून पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, कृषीप्रधान जळगाव जिल्ह्यातील हवामान बदल, अनियमित पर्जन्य व पाणीटंचाई यांसारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संरचित नियोजन, संसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि सक्षम स्थानिक नेतृत्वाची गरज अधोरेखित करण्यात आली.


कार्यक्रमात समवयीन-आधारित प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यशस्वी गावांचे नेतृत्व करणारे ‘सरपंच मास्टर ट्रेनर’ त्यांच्या अनुभवांद्वारे उत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करत होते. तसेच कामगिरी-आधारित प्रोत्साहन यंत्रणा, डिजिटल मूल्यांकन प्रक्रिया आणि राष्ट्रीय स्तरावरील सरपंच संवाद व्यासपीठाद्वारे ग्रामपातळीवरील सुशासन बळकट करण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया मेंबर हिमांशू पटेल,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मनोजकुमार चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमात नमूद करण्यात आले की ग्रामस्तरावरील सक्षम नेतृत्वातूनच स्वच्छ, निरोगी आणि हवामान-संवेदनशील गावे घडविता येतील, तसेच प्रभावी सुशासनामुळे जिल्हा, राज्य व राष्ट्राची सर्वांगीण प्रगती साध्य होईल.



Post a Comment

Previous Post Next Post