डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी नगराध्यक्ष

 


 नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांची कृतज्ञता

बदलापूर : महामानव यांनी भारतीय संविधानाद्वारे स्त्रियांना समानता, शिक्षण आदी अनेक हक्क दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंच्या संविधानामुळेच मी नगराध्यक्षपदावर विराजमान होऊ शकले, अशा शब्दांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्रगतशील बौद्ध समाज, बदलापूर शहर व ग्रामीण यांच्या वतीने बदलापूर पश्चिम येथील घोरपडे मैदानात नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या पुढाकाराने आयोजित ‘भीम महोत्सव’ उत्साहात पार पडला. या वेळी शुभेच्छा देताना नगराध्यक्ष घोरपडे म्हणाल्या, “करुनी जीवाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान, लिहिले भारतीय संविधान अशी माझ्या भीमरायाची शान.” त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करत समाजातील वंचित घटकांना प्रगतीची नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केल्याचे नमूद केले.


डॉ. बाबासाहेब केवळ भारतापुरते मर्यादित नसून जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त महामानव आहेत. तसेच यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूरमध्ये आपण राहत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही त्या म्हणाल्या. बदलापूरमधील सोनिवली येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५५ फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १४ एप्रिल रोजी त्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले. भीम महोत्सवाच्या आयोजनासाठी मुख्य निमंत्रक नगरसेवक प्रवीण राऊत व सहकाऱ्यांच्या परिश्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

 तर प्रवीण राऊत महापौर – राजेंद्र घोरपडे

बदलापूरमध्ये आगामी काळात महानगरपालिका स्थापन होण्याची शक्यता असून, त्यानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षण लागू झाल्यास प्रवीण राऊत हे पहिले महापौर होतील, असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केला. आमदार किसन कथोरे यांच्याशी चर्चा करूनच हा शब्द दिल्याचेही त्यांनी सांगितले.



 हजारोंच्या उपस्थितीत रंगला भीम महोत्सव

शनिवारी आयोजित भीम महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मैदान गर्दीने खच्चून भरले होते. आंबेडकरी अनुयायांसह कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील गटनेते शरद तेली, नियोजन सभापती संभाजी शिंदे, बांधकाम सभापती रमेश सोळसे, पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे आदींसह अनेक नगरसेवक व सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

“जागर महापुरुषांचा, जल्लोष भीम गीतांचा” हा कार्यक्रम महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला. आनंद शिंदे, समर्थक शिंदे, कडूबाई खरात, मंजुषा शिंदे, राखी चौरे आणि प्रबुद्ध जाधव यांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वर्धा येथील फिनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे यांनी आणि यांच्या बहुजन समाजासाठीच्या योगदानावर व्याख्यान देत उपस्थितांची दाद मिळवली.




Post a Comment

Previous Post Next Post